चालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे?

चालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे?



चालू घडामोडी हा टॉपिक इतका विस्तीर्ण आहे कि काय वाचावे आणि काय नाही हे पहिल्यांदा कळतच नाही आणि  आता तर फक्त मोजकेच दिवस बाकी आहेत पूर्व परीक्षेला.
काय करू आता मी जेणेकरून मला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील ह्या टॉपिक वर?” असा प्रश्न पडला बहुतेक सर्वांनाच, होय कि नाही? मला माहित आहे तुमची मनस्थिती. ओके, तर आपण सर्वात आधी हे समजून घेवू कि कुठ पासून ते कुठ पर्यंत चालू घडामोडीवर प्रश्न येवू शकतात पूर्व परीक्षेत, ठीक आहे?
सध्या मार्केट मध्ये खूप सारे पुस्तक आले आहेत ह्या विषयावर. पण सर्वच पुस्तक चांगले असतील व त्यामधील माहिती अचूक असेल ह्याची काय शास्वती ना?.
खालील लिस्ट प्रमाणे पुस्तक/मासिके वाचा म्हणजे तुम्ही सर्व काही कवर केलं असा समजावं.
सर्वात आधी खालील websites वरून study मटेरीअल डाऊनलोड करा जर आधी केलं नसेल तर. ते सर्व खूप कामाचा आहे हे मी अगोदरच्या पोस्ट्स मध्ये सांगितलंच आहे.
१) इंडिया 2016/2017– इंडिया इयर बुक 2016/2017
मित्रांनो, 2016 or 2017-चे इयर बुक घ्यावे. ते डाऊनलोड साठी उपलब्ध नाही.
इंडिया 2016 ह्या पुस्तकातून Diary of National Events .
२) जास्त माहितीसाठी हे रेफर करा: https://anilmd.wordpress.com/list-of-study-material-needed/
३) मेनस्त्रीम मासिक येथून वाचावे:  http://www.mainstreamweekly.net/ :
४) योजना मासिक येथून वाचावे: http://www.yojana.gov.in/ 
५) मनोरमा इयर बुक 2016/2017 – करंत अफेयर्स सेक्शन Current Affairs Section )
६) Frontline मासिक –
७) स्पेक्ट्रम ची Current Affairs गाईड जी एप्रिल मध्ये येते ती वाचावी. ह्यात सर्व काही वाचण्यासारखं असते व नक्कीच वाचावे.
८) Employment News: दर आठवड्याची. ह्यातून काय वाचावे: मुख्य पेज, मागील पेज वरील News Digest & Editorial.
९) सर्व वर्तमानपत्रे (लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस, एकोनोमीक टाईम्स, द हिंदू, महाराष्ट्र टाईम्स). हो, लक्ष द्या: ही सर्व वर्तमानपत्रे दररोज वाचून त्यावर स्वत:चे नोट्स काढा. हे सर्व करायला दररोज दोन ते तीन तास जातील, ते चालेल. हे केले नाही तर परीक्षेचा पेपर बघून मग बोंबा नका मारू.:)
वरील स्त्रोत्रातून काय  वाचायला  पाहिजे?
  • भारतीय, महाराष्ट्रीय, व जागतिक  स्तरावरील घडामोडी
  • आर्थिक, दोन देशामधील संबंध- अग्रीमेंत्स, स्पोर्ट्स , अवार्ड्स, S & T क्षेत्रातील घडामोडी, संसदेमधील कायदेविषयक दुरुस्त्या व इतर घडामोडी
  • समित्या व त्यांचे अध्यक्ष वगेरे
  • बजेट व त्याशी संबंधित घडामोडी
  • फिल्मी अवार्ड्स
  • इतर
कृपया हे लक्षात घ्यावे कि चालू घडामोडी हा विस्तीर्ण विषय आहे

MPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो?

जीवनात सोपं असं काही नसते. काही मिळवायचे असेल तर त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.
MPSC राज्यसेवा परीक्षा सुद्धा म्हणावी तशी सोपी नाहीये. तर मग ह्या परीक्षेत सफल व्हायला काय करावं लागणार आहे?
सर्वात प्रथम तुमच धेय्य निश्चित करा, ते पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत कोणत्या स्वरुपाची असायला पाहिजे हे मी सांगेन, ठीक आहे तर मग?
  • सर्वात आधी हे नक्की करा की तुम्ही जो अभ्यास करत आहे तेच तुम्हाला व्हायचं आहे का?
  • स्वप्न पाहण खूप सोपं आहे पण ते सिद्ध/पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत व हिम्मत लागते आणि हे खूप कठीण काम आहे. दुसरे म्हणतात म्हणून MPSC च स्वप्न पाहण चुकीच आहे, तुमचं स्वतःचा  तो निर्णय असावा लागतो.कारण त्यासाठी लागणारी मेहनत तुम्हालाच करावी  लागणार असते. तुम्ही स्वतःच निर्णय घ्या, तुमची लायकी काय आहे हे तुमच्याशिवाय कोण जाणू शकतं?
  • तुम्ही स्वत बघा की अश्या परीक्षेसाठी लागणारी मेहनत तुमच्या अंगी आहे का? तुमच्याजवळ तो सेल्फ-कोन्फिडेंस म्हणजेच आत्मविश्वास आहे का? सतत लागणारी दृढ इच्छाशक्ती आहे का?
  • जर वरीलपैकी काही नसेल तर मग असा व्यक्ती असफल्तेन व्याकूळ होतो आणि मग निराशेच्या अंधारात बुडून जातो.
  • पण जर तुमचा निर्णय तुमच्या मेहनती, आत्मविश्वासानं, दृढ इच्छाशक्तीन घेतलेला आहे अत्र मग निश्चिंत पुढे जा.
  • सुयोग्य स्टडी मटेरियल निवडा आणि अभ्यासाला लागा. तुमची एनर्जी इकडे तिकडे वाया ना घालवता अभ्यासात घाला.
राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास व्यापक/विस्तीर्ण (Wide Extensive ) व  मोजकाच (Selective Intensive) असावा. पूर्व परीक्षेसाठी विस्तीर्ण स्वरूपाचा करावा व मुख्य परीक्षेसाठी सिलेक्तीव स्वरूपाचा करावा.
राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा अभ्यास तर पूर्ण करावाच परंतु त्याव्यतिरिक्त चालू घडामोडींवर जास्त लक्ष केंद्रित करा. चालू घडामोडी कधीपासून बघाव्यात? पूर्व परीक्षेच्या एक वर्ष आधीपासून ! उदाहरणार्थ, २०१७ ची परीक्षा फेब्रुवारी किंवा एप्रिल मध्ये असू शकेल म्हणून मग १ जानेवारी २०१६ पासूनच्या सर्व घडामोडी वाचून समजून घ्या आणि त्यावर नोट्स तयार करा.
  • परीक्षेत चालू घडामोडींवर कसे प्रश्न येतात ते २०१६ ची ही प्रश्नपत्रिका बघितल्यावर समजेल: Click HERE
  • राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा अभ्यास तर पूर्ण करण्यासाठी कमीतकमी एक वर्ष (पूर्व परीक्षेच्या आधी) लागेल हे लक्षात ठेवूनच आपलं धेय्य ठरवायचं.    त्यानुसारच आपलं प्लानिंग करावं.
  • येणारी राज्यसेवा परीक्षा द्यायची असेल तर मग आजपासूनच एक क्षणाचाही विलंब न लावता सुरुवात करा.
  • दररोज कमीत कमी 10-12 तास अभ्यासाला द्या. मागील सात महिन्यांत काय घडले आहे त्याबद्दल सर्व माहिती शोधून काढा. कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न येवू शकतात ह्याची लिस्ट बनवा. त्यावर माहिती गोळा करा. नोट्स बनवा.
  • पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघून ६वी ते १२वी ची  पुस्तके वाचून काढा. NCERTच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद निघाले असून ते सुद्धा वाचून काढा.
  • त्यानंतर प्रत्येक विषयावर advanced पुस्तके वाचून त्यांचे सुद्धा नोट्स काढा.
  • हे सर्व करत असतांना, रिविजन करत रहा आणि मग सराव परीक्षा द्या  (घरी बसून प्रश्न पत्रिका सोडवून पहा) आणि तेही वेळेच्या बंधनात राहूनच (ह्यालाच सराव परीक्षा म्हणता येईल ना !)